
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रातील काही विशिष्ट शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढणारा ओढा तसेच त्यामध्ये असणाऱ्या काही व्यावसायिक चुकीच्या कार्यपद्धतीमुळे वर्षानुवर्ष आयुष्यातील उमेदीचा काळ केवळ तयारीसाठी वाया गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पदरी पडणारी निराशा या सगळ्याचा विचार करता करिअर कट्ट्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील IAS, IPS अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने "आयएएस आपल्या भेटीला" हा उपक्रम चालवला जातो. ज्या अंतर्गत UPSC,MPSC, SSC, पोलीस भरती आणि बँकिंग या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विषयीची प्राथमिक माहिती दिली जाते तसेच त्यांना त्या विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या पलीकडे जाऊन नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी निर्माण करणारे उद्योजक घडले पाहिजेत, या उद्देशाने “उद्योजक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत 3500 पेक्षा जास्त उद्योजक विद्यार्थ्यांना नियमितपणे उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन करीत असतात. या महत्त्वाच्या उपक्रमाबरोबरच नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत सुरू असलेल्या "चॉईस बेस क्रेडिट सिस्टम" अंतर्गत राज्यांमध्ये एकसूत्रता यावी व विद्यार्थ्यांना ग्रामीण व शहरी भागाची मर्यादा न राहता त्यांना तज्ञ प्रशिक्षकांची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने ऑनलाइन कोर्सदेखील सुरु करण्यात आलेले आहेत. प्रत्येकी 2 क्रेडिटचा 1 असे 50 कोर्सेस या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात.
राज्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना देशपातळीवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदांची माहिती उपलब्ध झाली आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी पदवीचे दोन ते तीन वर्ष त्यांनी मेहनत घेतली तर निश्चितच राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्रीयन युवकांचा मोठा वाटा आपल्याला बघायला मिळेल, तसेच जे विद्यार्थी या माध्यमातून यश मिळवू शकणार नाहीत त्यांना वेळीच त्यांचा प्लॅन बी तयार करून त्याच्यावर काम करणे सोपे होईल.उद्योजकता विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा अनुभव संपन्न उद्योजकांच्या मार्गदर्शनाचा भाग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य वृद्धीसाठी विद्यार्थ्यांना कोर्सेस दिले जातात तसेच "उद्योजक संसद" ही CENTER OF EXCELLENCE अंतर्गत तयार केली जाते ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीच्या वेगवेगळ्या पदांवर काम करण्याचा अनुभव दिला जातो तसेच त्यांना भांडवल देखील उपलब्ध करून दिले जाते. ज्या पद्धतीने नेतृत्व विकासासाठी विद्यार्थी संसद आतापर्यंत कार्यरत आहे आणि त्याचे होणारे सामाजिक चांगले परिणाम आपण बघत आहोत त्याच पद्धतीने उद्योजक संसद हे देखील राज्याच्या उद्योजकीय विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतील असे वाटते, त्यामुळे "करिअर कट्ट्याचा" हा उपक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयातील पदवीला प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत दरवर्षी 14 लाखहून अधिक विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेशित असतात. बहुतांशी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयीचे योग्य ज्ञान व माहिती ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला किंवा पदवी पूर्ण झाल्यानंतर मिळते आणि त्यानंतर ते तयारीला सुरुवात करतात. वयोमर्यादेमुळे पुरेसा वेळ तयारीसाठी मिळत नाही तसेच तयारीची दिशादेखील बदलते. देशातील काही दक्षिणेतील राज्यांमध्ये ही तयारी करण्यासाठी प्राथमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावर प्रयत्न केले जात असतात. याच पार्श्वभूमीवर आपण आपल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये प्रवेशित होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्या सेमिस्टर मध्येच तीस तासांचा म्हणजेच दोन क्रेडिटचा एक कोर्स देऊन देशभरामध्ये असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, पदनाम, अभ्यासक्रम, तयारीचे स्वरूप इ.ची माहिती देणारा कोर्स दिला जाईल.
१) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांबरोबरच खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधीची क्षमता वाढवायची असेल तर महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकीय कौशल्य विकास होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे उद्योजकीय क्षेत्रातील विविध संधी, कौशल्य व कार्यपद्धती याची माहिती देणारा दोन क्रेडिटचा कोर्स विद्यार्थ्यांना दुसऱ्या सेमिस्टरमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
२) शासकीय नोकरी व उद्योजकता या पलीकडे जाऊन खाजगी आस्थापनावर असणाऱ्या वेगवेगळ्या नोकरीसाठी आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्या कौशल्य विकास उपक्रमांची माहिती व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठीचा एक कोर्सदेखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.
३) 240 भागांमध्ये संपूर्ण भारतीय संविधानाचे तुलनात्मक प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम देखील तयार करण्यात आलेला आहे व त्यावर आधारित तीस तासांचा भारतीय संविधानाची ओळख करून देणारा कोर्स देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.
४) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शास्त्राची ओळख व यामध्ये होणारे बदल याविषयी देखील दोन क्रेडिटचा कोर्स करिअर कट्ट्यांतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. करिअर कट्ट्याअंतर्गत स्पर्धा परीक्षेचा बेसिक पहिला क्रेडिट कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील पद्धतीचे सविस्तर प्रशिक्षण देणारे कोर्सेस उपलब्ध आहेत.
जाईल.
१. UPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम.
२. MPSC लेखी परीक्षेची तयारी.
३. SSB व SSC परीक्षेचा तयारीसाठी अभ्यासक्रम.
४. बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसाठी आवश्यक असणारे स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण.
५. पोलीस भरतीसाठी असणारे लेखी परीक्षेचे प्रशिक्षण.
१) सर्व पद्धतीच्या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या मुलाखतींची तयारी करून घेण्यासाठी कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट तसेच इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाईल. पदवी पूर्ण केल्यानंतर पाया मजबूत असणारे हेच विद्यार्थी पुढे जाऊन राज्य शासनाच्या ट्रेनिंग सेंटर साठी उपलब्ध झाले तर ट्रेनिंग सेंटरच्या यशस्वीतेमध्ये वाढ होण्यास देखील याची मदत होईल
१) विद्यार्थ्यांना 365 रुपये मध्ये 1000 दिवसांसाठी म्हणजेच तीन वर्षांसाठी त्याचे सभासद होता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना 1000 दिवस सातत्यपूर्ण स्पर्धा परीक्षा, उद्योजकता विकास याविषयीचे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल.
२) विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक असणाऱ्या चॉईस बेस सिस्टम अंतर्गत आवश्यक असणारे 50 शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध असतील, पैकी प्रतिवर्ष 5 कोर्सेस मोफत शिकवले जातील.
३) महाविद्यालयाच्या वेळेव्यतिरिक्त व ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध असेल.
४) मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.
❖ अभूतपूर्व असा हा उपक्रम
❖ 03 वर्षाचे 1000 दिवस हा उपक्रम राबवला जाईल.
❖ दररोजचा खर्च प्रती विद्यार्थी केवळ 0.36 पैसे
❖ राज्यात उपलब्ध असणाऱ्या किमान साधनांचा उपयोग करून हा उपक्रम राबवणे शक्य आहे.
❖ कुटुंबासाठी प्रति विद्यार्थी येणारा 3 वर्षाचा खर्च हा 365 रुपये इतका असल्यामुळे त्याला तो सहज शक्य आहे.
❖ सातत्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून त्या विषयाची आवड निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक मानसिकता तयार करणे हे सहज शक्य आहे.
❖ शिक्षण विभागाचे मंत्री महोदय दर महिन्याला राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना संबोधित करू शकतील.
❖ महाविद्यालयातील १० टक्के गरजू विद्यार्थ्यांना मोफत सदस्यत्व दिले जाते.
❖ उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जबाबदारी – सदर उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी विद्यापीठ प्रशासनाबरोबरच सहायक शिक्षण संचालकांच्या मदतीने महाविद्यालयापर्यंत उपक्रमाची माहिती पोहचवणे. सदर उपक्रम अपेक्षित परिणाम देत आहे की नाही, यासाठी वेळोवेळी अहवाल मागवुन घेणे व गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करणे .
❖ महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राची जबाबदारी- आवश्यक असणारी सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे, आवश्यक असणारे सर्व व्याख्याते, मार्गदर्शक उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांच्यापर्यंत माहिती पोहचण्यासाठी नियमित उपक्रमाची दिनदर्शिका उपलब्ध करून देणे, उपक्रम नियमितपणे व सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उभी करणे.
❖ विद्यापीठस्तरीय जबाबदारी – संलग्न महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यासाठी विद्यापीठ प्रकल्प संचालकांच्या माध्यमातून माहिती पोहोचवणे.
❖ महाविद्यालयांची जबाबदारी- महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यासाठी प्रकल्प संचालकांच्या माध्यमातून माहिती पोहोचवणे.
1. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा व उद्योजकता विकास यासाठी IAS आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला हे उपक्रम.
2. भारतीय संविधानाचे पारायण
3. वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी
4. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
5. Incubation Center उद्योजकता विकासासाठी
6. कौशल्य विकासासाठी मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर
7. विद्यार्थ्यांचे कौशल्य वृद्धीसाठी ५० ऑनलाईन मोफत कोर्सेस
8. प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा
9. प्राध्यापकांसाठी आवाजाची कार्यशाळा
10. वेगवेगळे MOU उपक्रमाच्या माध्यमातून नॅकमध्ये २४० पेक्षा जास्त गुणांची महाविद्यालयास होणारी उपयोगिता
11. महाविद्यालयिन समन्वयक व प्राचार्य यांच्यासाठी मानधनाची तरतुद .
12. विद्यार्थी नोंदणी :- 1) ऑनलाइन पद्धतीने 2) ऑफलाइन पद्धतीने
13. आर्थिक साक्षरता कार्यशाळा